Call : Ingaledeshmukh: 9890169830, (0217) 2729475


Brides
Grooms
NRI

            मराठा समाजातील मुले-मुली उच्चशिक्षित होत चालले असून नोकरी, शिक्षण, व्यवसाय आदीमुळे मराठा समाजातील बहुतांश समाज बांधव व भगिनी आपल्या गावापासून परदेशात वास्तवयास जात आहेत. ही बाब समाजास भूषणावह आहे. पण त्यांच्या संसारीक प्रश्णाबाबत पालक वर्गात दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे. कारण पूर्वीच्या परंपरे प्रमाणे नात्यातल्या-नात्यात व आजूबाजूच्या गावात जवळच्या नात्यातच सोयरीक् जुळविली जात होती. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. शिक्षण नोकरी व्यावसाय आदीमुळे समाज बांधव अन्यत्र विखुरले गेले आहेत. त्यामुळे पाल्यांची लग्न जमविने अवघड होत आहे.

            तसेच उच्च शिक्षण व नोकरी यामुळे मुला-मुलींच्या अपेक्शांप्रमाणे योग्यतेच्या वर अथवा वधू मिळत नसल्याने पर ठिकाणच्या वधू-वरांची शोधाशोध सुरू असल्याचे दिसून येते व वधू-वरांच्या शोधात व अपेशेत बसण्यासाठी जी पालकांची दमछाक होत आहे. याकरिता समाजातील सूज्ञ समाज बांधव पुढे आले आहेत. व यातूनच वधू-वर सूचक केंद्राची निर्मीती होऊ लागली.

            आज जागो-जागी वधू-वर सूचक केंद्रे स्थापन झाली आहेत. आपल्या मुलास किंवा मुलीस योग्य जोडीदार मिळावा ही प्रत्येक पालकांची किंवा वधू-वरांची अपेक्षा असते.  स्वाताच्या घरातील मुलीला वर शोधण्यासाठी करावी लागलेली धावपळ, अडचणी डोळ्यासमोर ठेवून सोलापूर शहरातील इंगळे-देशमुख ग्रुपने इतर पालकाना असा त्रास होऊ नये म्हणून वर्ष 2003 पासून "वधू-वर" सूचक केंद्र सोलापूर येथे सुरू केले. त्यास मराठा समाजातील सर्व स्तरातील समाज बांधवानी उस्फुर्त साथ दिली.  हे कार्य आजमितीला प्रगती पथावर असून सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद व सांगली आदी ठिकाणी वधू-वर सूचक मेळावे घेऊन आतापर्यंत हजारो विवाह जमविले. तसेच औरंगाबाद येथे सकल मराठा वधू-वर सूचक केंद्र चे विभागीय कार्यालय सुरू केलेले आहे. व लवकरच पुणे, मुंबई व कोल्हापूर या ठिकाणी विभागीय कार्यालय सुरू करीत आहोत.

            मंडळाकडे सध्या डॉक्टर, इंजिनियर, रजपात्रिक अधिकारी, व्यावसायिक अशा 10000 वधू-वरांच्या स्थळांची माहिती उपलब्ध असून दररोज सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत टेलिफोन व मोबाईल द्वारे नव-नवीन स्थळांची माहिती सर्व पालकाणा पुरविली जाते. अशा प्रकारे सदर कार्य संपूर्ण महाराष्ट्रात अविरत चालू आहे. तरी वधू-वरांच्या पालकाणी सदर केंद्रात आपल्या पाल्यांची नातेवाईकांची नाव नोंदणी करून लग्न जमविण्याच्या प्रक्रियेसाठी नोंदणी फी रु 2200/- दोन वर्षा साठी खर्च म्हणून द्यावी.

धन्यवाद!

आपले हितचिन्तक,
शिवश्री प्रतिष्ठान
सर्व संचालक मंडळ सोलापूर